दहा वर्षांत भारतात सिझेरियनची संख्या दुप्पट - पाहा व्हीडिओ
भारतात गेल्या दहा वर्षांत सिझेरियनच्या केसेस दुप्पट झाल्या आहेत असा दावा NATIONAL FAMILY HEALTH SURVEY -4च्या अहवालात केला गेला आहे.
अनेक महिला स्वतःहून डॉक्टरांना सिझेरियन करायला सांगत आहेत.
आहारात बदल, लठ्ठपणा, ब्लडप्रेशर, डायबेटिस अशा कारणांमुळे सिझेरियन करावं लागतं. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ रेणू मलिक सांगतात की, "आधी खूप मुलं व्हायची, आता कुटुंब छोटी झाली आहेत. मुलींनाही फार लाडाकोडात वाढवलं जातं. त्यांची सहनशक्ती खूप कमी झाली आहे.त्या सरळ सांगतात की आम्ही त्रास सहन नाही करू शकत. तुम्ही प्लीज माझं सिझेरियन करा."
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)