गोरं दिसण्यासाठी लावली जाणारी क्रीम धोकादायक ठरू शकते

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - गोरं दिसण्यासाठी लावली जाणारी क्रीम धोकादायक ठरू शकते

तुम्हीही गोरं दिसण्यासाठी फेअरनेस क्रीम लावत असाल त्या क्रीममध्ये काय-काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे.

बहुतांश फेअरनेस क्रीममध्ये पाऱ्यासारखे धोकादायक घटक असतात. त्यांचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

अशा क्रीममध्ये हायड्रोक्वीनोन नावाचा ब्लीचिंग एजंट असतो. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते याचं प्रमाण हे 4 टक्क्यांपेक्षा कमी असावं.

डॉक्टरांच्या मते हायड्राक्विनोन असलेल्या क्रीम केवळ हाता-पायांनाच लावायला पाहिजे.

UKच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस मते ब्लीचिंग एजंट चुकीच्या ठिकाणी लावलं तर त्वचेची जळजळ होते आणि ती सुजू शकते.

गरोदरपणाच्या वेळी चुकीची क्रीम वापरली तर त्याचा बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं फेअरनेस क्रीमची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ती वापरू नका.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)