‘केवळ आश्वासन नाही, तर बालविवाह रोखणाऱ्यालाच मी मत देईन’
“यंदाच्या निवडणुकीत मी पहिल्यांदा मतदान करेन. मी त्याच लोकांना मत देईन जे बालविवाह रोखतील आणि मुलींच्या शिक्षणाला उत्तेजन देतील,” गुंटूर जिल्ह्यातील सय्यद सईदाबी सांगते. या भागात सर्रास बालविवाह होतात.
सईदाच्या बहिणीचं लग्न 14 व्या वर्षी झालं. लहान वयातल्या गरोदरपणामुळे तिचं तिन्ही मुलांच्या वेळेस सिझेरियन करावं लागलं. तिचं शरीर गरोदरपणासाठी तयारच नव्हतं.
तिच्या मावशीची गोष्ट तर अजून भयानक होती. ती दहावीत असताना तिचं लग्न करून दिलं. तिसऱ्या बाळंतपणात तिचा मृत्यू झाला. तेव्हा तिचं वय होतं फक्त 17 वर्षं.
बालविवाहाचे चटके कुटुंबातच अनुभवल्यामुळं सईदा म्हणते, “केवळ आश्वासन देणाऱ्याला नाही, तर बालविवाह रोखणाऱ्यालाच मी माझं मत देईन.”
रिपोर्टर - संगिथम प्रभाकर
व्हीडिओ शूट आणि एडिट - नवीन कुमार के.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)