जेव्हा मॉडेल संगीताने ठणकावलं 'हम काले है तो क्या हुआ...?'
'काळी', 'वांग्यासारखी दिसते' अशी शेरेबाजी तिच्याही नशिबात आली. पण त्याकडे दुर्लक्ष करत 23 वर्षांच्या संगीतानं जिद्दीनं मॉडेलिंग इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं.
गोरेपणा म्हणजे सौंदर्य, अशी एक समजूत आपल्याकडं रूढ आहे. रंगावरून केला जाणारा हा भेद अनेकदा इतक्या टोकाला जातो की, काळ्या किंवा सावळ्या वर्णाच्या मुलामुलींना चिडवलंही जातं.
राजस्थानमधून आलेल्या 23 वर्षांच्या संगीता घारूची कहाणी काही वेगळी नव्हती. आज संगीतानं मॉडेलिंग इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)