पाहा Miss Deaf Asia झालेल्या मुलीचा थक्क करणारा प्रवास
23 वर्षांच्या निष्ठा बहिऱ्या आहेत आणि त्यांनी Miss Deaf Asia 2018चा किताब जिंकला आहे. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
याआधी निष्ठा यांनी टेनिसमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. "टेनिस खेळणं बंद करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर मी काहीतरी नवं करायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण Miss Blind India झाली होती. मग मला वाटलं Miss Deaf असंही काही असू शकेल. मी इंटरनेटवर सर्च केलं तर Miss Deaf India अशी स्पर्धा खरंच आहे हे समजलं, असं त्या सांगतात.
निष्ठा सध्या दिल्लीत राहतात. 5.5 इंचाच्या हील्स घालून रँपवॉक करणं खूप अवघड होतं. कारण आयुष्यभर त्या आतापर्यंत स्पोर्ट्स शूज घालून खेळल्या होत्या.
"माझ्या आई-बाबांचं खरंच कौतुक आहे. त्यांनी माझ्याबाबत कधी हार नाही मानली. त्यांनीच मला बोलायला शिकवलं. मी बहिरी आहे म्हणून कधी वेगळं वागवलं नाही. इतर आई-बाबांसारखे प्रसंगी ते माझ्यावर रागावले आणि चांगलं काम केलं तर शाबासकीही दिली," असं त्या आवर्जून सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)