व्हेनेझुएलातल्या 90 टक्के लोकांवर ओढावलंय दरिद्र्य आणि उपासमार

व्हीडिओ कॅप्शन, व्हेनेझुएलातले 90 टक्के लोक दरिद्री झाले आहेत

व्हेनेझुएलात गरिबीनं हजारो लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणलं आहे. एका अहवालानुसार, इथले 90 टक्के लोक दारिद्र्यात जगत आहेत. विरोधाभास असा की, व्हेनेझुएलाकडे जगातले सगळ्यांत मोठे तेलसाठे आहेत.

इथली मुलं अन्नाअभावी रस्त्यावर बाहेर पडली आहेत. अनेकांच्या कुटुंबात अन्नावरून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. अन्नासाठी ही मुलं आणि इथले नागरिक कचराकुंड्यांवर फिरत आहेत. तर, मारिया नावाच्या एका महिलेनं आपल्या पाच मुलांपैकी 3 जणांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे.

बोटावर मोजता येतील इतकेच आंतरराष्ट्रीय पत्रकार व्हेनेझुएलामध्ये पोहचू शकले आहेत. त्यापैकी एक आहेत बीबीसीचे व्लादिमिर हर्नांदेज. त्यांचाच हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)