दहा वर्षांच्या बंदीवासानंतर या व्हेल्स मारणार स्वातंत्र्याची डुबकी

व्हीडिओ कॅप्शन, दहा वर्षांच्या बंदीवासानंतर 'या' दोन व्हेल्सना मिळणार स्वातंत्र्य

चीनमधल्या एका मरिन पार्कमध्ये 10 वर्ष लोकांचं मनोरंजन केल्यानंतर बेलुगा जातीच्या दोन व्हेल्सना आता स्वातंत्र्य मिळणार आहे.

पण, यासाठी हे व्हेल माशांना 9 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. लिटील ग्रे आणि लिटील व्हाईट या दोन व्हेल्सना विमानने चीनमधून आईसलँड इथे आणलं जाईल. सुरुवातीला काही दिवस इथे त्यांना एका विशेष सागरी अधिवासात ठेवलं जाईल. इथे त्या व्यवस्थित जगल्या तर त्यांना सागरी अभयारण्यात सोडण्यात येईल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)