पाहा व्हीडिओ : 'माझ्या स्वयंपाकाने मला नवा आत्मविश्वास दिला'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'माझ्या स्वयंपाकाने मला नवा आत्मविश्वास दिला'

भेटा पाकिस्तानच्या आमना रियाज यांना.

त्या यूट्यूबवर ‘किचन विथ आमना’ हे चॅनल चालवतात. यूट्यूब गोल्ड प्ले बटन मिळवणाऱ्या त्या पहिल्या पाकिस्तानी महिला आहेत.

दोन वर्षांपूर्वी त्या काहीच करत नव्हत्या आणि स्वतःला कमी लेखायच्या. पण त्यांना स्वयंपाकाची आणि नवनवीन रेसिपी करून पाहाण्याची फार हौस होती.

भावाच्या सल्ल्यावरून त्यांनी यू-ट्यूबवर रेसिपीचे व्हीडिओ टाकायला सुरुवात केली. आज त्यांच्या चॅनेलला पाकिस्तानात 20 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)