माळावरची मेजवानी : औरंगाबादचा हुर्डा
कोल्हापूरचं रस्सामंडळ किंवा विदर्भातले रोडगे यांच्याच तोडीचा आणि अगदी प्रख्यात असलेला पदार्थ म्हणजे हुर्डा! हुर्डा पार्टी ही एक संस्कृती आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये ज्वारीची कणसं टरारली की, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या हुर्डा पार्ट्यांचे वेध लागतात. ज्वारीची कणसं शेकोटीत भाजून त्यातील दाणे ठेच्याबरोबर खाण्याची मजा वेगळीच असते.
आता या हुर्डा पार्ट्यांचं व्यावसायिक स्तरावर आयोजन केलं जातं.
बीबीसी मराठीसाठी शूट अमेय पाठक आणि एडिट रोहन टिल्लू
(अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)