पाहा व्हीडिओ : फुटबॉलसाठी फॅन्सचा भन्नाट प्रवास
फिफा वर्ल्ड कपसाठी काही फॅन्स भन्नाट प्रवास करून रशियात पोहोचले आहेत. काहींनी तर 90 हजार किलोमीटरचं अंतर सायकलने किंवा कारनं पार केलं आहे. अशाच काही फॅन्सच्या प्रवासाच्या सुरस कथा.
रशिया हा देश तसा अवाढव्य पसरलेला. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपच्या मॅच होत असलेल्या 11 ठिकाणी पोहोचणं हे तसं आव्हानच.
विमान प्रवास परवडला नाही तर तुमच्या टीमबरोबर सगळीकडे फिरणं शक्यच होणार नाही. पण, ही आर्थिक अडचण नसलेल्या लोकांनीही अगदी आपल्या देशापासून रशियात पोहोचण्यासाठी काही भन्नाट मार्ग शोधून काढले.
काहींनी हौसेसाठी तर काहींनी सामाजिक सेवा म्हणून प्रवास केला आहे.
दोन मित्रांनी 90 हजार किलोमीटरचं अंतर व्हॅनमधून पार केलं. त्यांची व्हॅन त्यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय टीमच्या रंगांत रंगवली आहे.
तर एका फुटबॉल फॅनने सायकलवरून रशिया गाठलं अनाथ मुलांसाठी पैसे गोळा करत. अशा भन्नाट प्रवासांच्या भन्नाट कथा ऐकण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)