You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेस्ट नेचर फोटो : ओरांगउटानचं हे छायाचित्र का ठरलं बेस्ट?
बोर्निओतल्या ओरांगउटानचं हे छायाचित्रानं नॅशनल जिओग्राफीकचं 2017 मधलं सर्वोत्तम निसर्ग चित्र ठरलं आहे.
तब्बल 11000 प्रवेशिकांमधून हे छायाचित्र निवडलं गेलं आहे. सिंगापूरस्थित वन्यजीव फोटोग्राफर जयप्रकाश बोजन यांनी हा फोटो कसा टिपला यामागची गोष्ट बीबीसीला सांगितली.
ओरांगउटान पाण्याला घाबरतात. शक्यतो ते पाण्यात उतरत नाही. पण अवैध जंगलतोड आणि पामच्या लागवडीनं त्यांचं जगणं कठीण झालं आहे.
ओरांगउटानचा अधिवास धोक्यात आल्याचं हा फोटो दर्शवत असल्यानं समीक्षकांनी त्याची बेस्ट नेचर फोटो म्हणून निवड केली.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)