एक्झिट पोलची आकडेवारी समोर, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्या-आघाड्यांसह अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदानाला सुरुवात
  • राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
  • सत्ताधारी महायुती, विरोधक महाविकास आघाडी या प्रमुख दोन आघाड्यांसह इतरही अनेक पक्ष मैदानात
  • राज्यातील 288 जागांवर विविध पक्षांचे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
  • आज मतदान पार पडल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागणार
  • आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  1. महानगरपालिका निवडणूक : 'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल, तरी मतदान करता येणार

  2. एक्झिट पोल कसे केले जातात? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांचे अंदाज किती सटिक ठरले?

  3. 23 तारखेला निकाल

    आज दिवसभरात आपण लाइव्ह पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या घडामोडी जाणून घेतल्या.

    काही ठिकाणी मारामारी, ईव्हीएम मशीनची तोडफोड अशा घटनाही घडल्या. संध्याकाळी मतदान संपल्यावर एक्झिट पोलची आकडेवारी आल्यावर सरकार कोणाचं येणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

    23 तारखेला आता महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.आता हे लाईव्ह पेज थांबवत आहोत.23 तारखेला पुन्हा निकालाच्या निमित्ताने आपण क्षणोक्षणीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवू.धन्यवाद.

  4. मतदानानंतर देवेंद्र फडणवीस आणि मिलिंद देवरा काय म्हणाले?

    hhhhh

    फोटो स्रोत, Getty Images

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलं आहे आणि आता एक्झिट पोलचे अंदाज येण्यास देखील सुरूवात झाली आहे.

    मतदानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्या ज्या वेळेस मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते, त्या त्या वेळेस भाजपाला त्याचा फायदा होतो. मला असं वाटतं की मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ आमच्या आणि महायुतीच्या फायद्याची ठरेल."

    एक्झिट पोल वर शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा म्हणाले, "या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येईल याची मला खात्री आहे. ज्याप्रकारे हरियाणात एनडीए आणि भाजपानं एका 'फेक नरेटिव्ह'चा पराभव केला. त्याचप्रकारे महाराष्ट्रात देखील महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी महाविकास आघाडीच्या 'फेक नरेटिव्ह'ला संपवलं."

  5. महाराष्ट्र, झारखंडमध्ये संध्याकाळपर्यंत किती मतदान?

    महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता संपलं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के तर झारखंडमध्ये 67.59 टक्के मतदान झालं आहे.

    महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आलं. तर झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांसाठी आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं.

    13 नोव्हेंबरला झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात तिथे जवळपास 65 टक्के मतदान झालं होतं. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केले जाणार आहेत.

  6. X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. एक्झिट पोलची आकडेवारी समोर, कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

    fff

    राज्यात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश सर्व्हेमध्ये महायुतीचे सरकार बनणार असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात बहुमताचा आकडा 145 इतका आहे.

    • मॅटराइज सर्व्हेनी सांगितले की भाजप आणि मित्रपक्षांना 150-170 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्रपक्ष ( मविआ) ला 110-130 जागा मिळू शकतात. इतरांना 8-10 जागा मिळतील.
    • पीपल्स पल्सने महायुतीला 182 तर महाविकास आघाडीला 97 जागा सांगितल्या आहेत. चाणक्य स्ट्रॅटेजीजने महायुतीला 152 ते 160 जागा सांगितल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 130-138 जागा सांगितल्या आहेत. इतरांना 6-8 जागा मिळतील असं त्यांनी सांगितले आहे.
    • पी- मार्कने सांगितले आहे की महायुतीला 137-157 इतक्या जागा मिळतील तर मविआ ला 126 ते 146 या इतक्या जागा मिळण्याचा अंदाज आहे.
    • लोकशाही मराठी -रुद्रच्या सर्व्हेनुसार महायुतीला 128 ते 142 तर महाविकास आघाडीला 125 ते 140 आणि इतरांना 18-23 जागा मिळतील असं म्हटलं आहे.
    • टाइम्स नाऊ- जेवीसीच्या सर्व्हेनुसार महायुतीला 150 ते 167 आणि महाविकास आघाडीला 107-125 आणि इतरांना 13-14 जागांचा अंदाज वर्तवला आहे.
    मतदान

    फोटो स्रोत, Getty Images

  8. ggg
  9. बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर युगेंद्र पवारांच्या आई का भडकल्या?

    व्हीडिओ कॅप्शन, बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर युगेंद्र पवारांच्या आई का भडकल्या?
  10. महाराष्ट्रातल्या 'या' आहेत पाच चुरशीच्या लढती, संपूर्ण राज्याचं लागलंय लक्ष

    ggg

    फोटो स्रोत, FACEBOOK

    सहा प्रमुख पक्ष असलेल्या यंदाच्या निवडणुकीचा आजचा हा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे.

    अत्यंत स्पर्धात्मक वळणावर असलेल्या या राजकीय लढतींसाठी 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

    अनेक ठिकाणी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्या एकमेकांशी भिडणार आहेत.

    या राजकीय संघर्षात राज ठाकरे यांची मनसे, असदुद्दीन ओवेसी यांची AIMIM, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यासारख्या इतर राजकीय पक्षांची भूमिका देखील येणाऱ्या काळात प्रभावी ठरणार आहे.सविस्तर वाचा- महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे.

  11. एक्झिट पोल्स कसे केले जातात? एक्झिट पोलचे अंदाज अचूक असतात का?

    व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात?
  12. मतदान केंद्राच्या पायरीवरच मृत्यू, जिंतूर तालुक्यातील घटना

    मतदान करण्यासाठी केंद्रात जात असताना पायरीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने एका 55 वर्षीय मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथे घडली.

    विधानसभा निवडणुकीसाठी जिंतूर तालुक्यातील 438 मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या विधानसभेसाठी 49 टक्के मतदान झाले आहे.

    जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथील केंद्रावर सकाळी 7 वाजता लिंबाजी पांडुरंग खिस्ते (55) या ज्येष्ठ मतदाराचे मतदान पहिल्यांदा होणार होते.

    लिंबाजी खिस्ते हे मतदानाला जात असताना केंद्राच्या पायरीवर आले असता त्यांना हृदयविकाराचा अचानक झटका आला. त्यानंतर तेथील उपस्थितांनी प्रशासनाच्या मदतीने त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

    मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लिंबाजी खिस्ते यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

  13. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान

    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे.

    राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

    अहमदनगर - 61.95 टक्के,

    अकोला - 56.16 टक्के,

    अमरावती - 58.48 टक्के,

    औरंगाबाद- 60.83 टक्के,

    बीड - 60.62 टक्के,

    भंडारा- 65.88 टक्के,

    बुलढाणा- 62.84 टक्के,

    चंद्रपूर- 64.48 टक्के,

    धुळे - 59.75 टक्के,

    गडचिरोली- 69.63 टक्के,

    गोंदिया - 65.09 टक्के,

    हिंगोली - 61.18 टक्के,

    जळगाव - 54.69 टक्के,

    जालना- 64.17 टक्के,

    कोल्हापूर- 67.97 टक्के,

    लातूर _ 61.43 टक्के,

    मुंबई शहर- 49.07 टक्के,

    मुंबई उपनगर- 51.76 टक्के,

    नागपूर - 56.06 टक्के,

    नांदेड - 55.88 टक्के,

    नंदुरबार- 63.72 टक्के,

    नाशिक - 59.85 टक्के,

    उस्मानाबाद- 58.59 टक्के,

    पालघर- 59.31टक्के,

    परभणी- 62.73 टक्के,

    पुणे - 54.09 टक्के,

    रायगड - 61.01 टक्के,

    रत्नागिरी- 60.35 टक्के,

    सांगली - 63.28 टक्के,

    सातारा - 64.16टक्के,

    सिंधुदुर्ग - 62.06टक्के,

    सोलापूर -57.09 टक्के,

    ठाणे - 49.76 टक्के,

    वर्धा - 63.50 टक्के,

    वाशिम -57.42 टक्के,

    यवतमाळ - 61.22 टक्के

    मतदान झाले आहे.

  14. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 49.07 टक्के मतदान

    विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज 20 नोव्हेंबर २2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 49.07 टक्के मतदान झाले आहे.

  15. विनोद तावडेंना ताटकळत ठेवणारे वसई-विरारचे 'आप्पा' उर्फ हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

    विनोद तावडेंना ताटकळत ठेवणारे वसई-विरारचे 'आप्पा' उर्फ हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

    फोटो स्रोत, X

    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तब्बल चार तास घेराव घालणाऱ्या वसई विरारच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचं नाव सध्या चर्चेत आहे.

    नालासोपारा पूर्व येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आणि त्यानंतर त्या हॉटेलमध्ये जे काही घडलं ते एखाद्या चित्रपटाला शोभावं असंच होतं.

    मुळात भाजपसारख्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणिसांना अशा पद्धतीने अडवून ठेवणारे हे हितेंद्र ठाकूर कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय?

    ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तो बहुजन विकास आघाडी म्हणजेच बविआ हा पक्ष किती मोठा आहे? त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं आहे?

    या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही वसई, विरार आणि नालासोपारामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बोललो आणि त्यांची मतं जाणून घेतली.

  16. परळी मतदारसंघात मारामारी

    बीडमधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे बुथ पाहणीसाठी गेले असताना तेथे त्यांना मारहाण करण्यात आली आहे, अशी माहिती प्रसारित झाली आहे.

    या घटनेमुळे बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर बीडमधील घाटनांदूर या मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे.

    परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून मंत्री धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख अशी लढत होत आहे.

    यावर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “परळी मतदारसंघातील घाटनांदूर (ता.अंबाजोगाई) येथे अज्ञातांनी मतदानयंत्राला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने त्वरित नवी यंत्रे बसवून मतदान सुरू केले आहे. आधी नोंदवलेली मते सुरक्षित असून मतमोजणीच्या वेळी ती मोजली जातील. निर्भीडपणे मतदान करा.”

  17. आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

    fff

    फोटो स्रोत, UGC

    आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली.

    सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

    बेदरवाडी येथील मतदान केंद्रावरील हाणामारीचा व्हिडिओ सध्याला प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.याबाबत आणखी माहिती येथे अपडेट केली जाईल

  18. राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.523 टक्के मतदान

    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.

    राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

    • अहमदनगर - 47.85 टक्के,
    • अकोला - 44.45 टक्के,
    • अमरावती - 45.13 टक्के,
    • औरंगाबाद- 47.05 टक्के,
    • बीड - 46.15 टक्के,
    • भंडारा- 51.32 टक्के,
    • बुलढाणा- 47.48 टक्के,
    • चंद्रपूर- 49.87 टक्के,
    • धुळे - 47.62 टक्के,
    • गडचिरोली- 62.99 टक्के,
    • गोंदिया - 53.88 टक्के,
    • हिंगोली - 49.64 टक्के,
    • जळगाव - 40.62 टक्के,
    • जालना- 50.14 टक्के,
    • कोल्हापूर- 54.06 टक्के,
    • लातूर - 48.34 टक्के,
    • मुंबई शहर- 39.34 टक्के,
    • मुंबई उपनगर- 40.89 टक्के,
    • नागपूर - 44.45 टक्के,
    • नांदेड - 42.87 टक्के,
    • नंदुरबार- 51.16 टक्के,
    • नाशिक - 46.86 टक्के,
    • उस्मानाबाद- 45.81 टक्के,
    • पालघर- 46.82 टक्के,
    • परभणी- 48.84 टक्के,
    • पुणे - 41. 70 टक्के,
    • रायगड - 48.13 टक्के,
    • रत्नागिरी- 50.04 टक्के,
    • सांगली - 48.39 टक्के,
    • सातारा - 49.82 टक्के,
    • सिंधुदुर्ग - 51.05 टक्के,
    • सोलापूर - 43.49 टक्के,
    • ठाणे - 38.94 टक्के,
    • वर्धा - 49.68 टक्के,
    • वाशिम - 43.67 टक्के,
    • यवतमाळ - 48.81 टक्के

    असे मतदान झाले आहे.

  19. 111 वर्षांच्या आजींचे मतदान

    गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी 7 वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.

    लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत.

    fff

    फुलमती सरकार यांचा जन्म 1 जानेवारी 1913 रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.

    आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी 111 वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

    निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता.

    त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. लोकशाहीच्या उत्सवात तब्बल 111 वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.

    ffff

    प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

    प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे, पुरवठा अधिकारी इंगोले, तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.

  20. मतदानासाठी उतरले बॉलिवूड

    मुंबईत सुरू असलेल्या मतदानामध्ये बॉलिवूडमधल्या विविध कलाकारांनीही सहभाग घेतला. यामध्ये प्रसिद्ध लेखक, गायक, कवी, अभिनेते, अभिनेत्री यांचा समावेश होता.त्यांच्यापैकीच काहींची छायाचित्रे-

    गुलजार आणि मेघना गुलजार

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, गुलजार आणि मेघना गुलजार
    रकुल प्रित सिंह आणि जॅकी भगनानी

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रकुल प्रित सिंह आणि जॅकी भगनानी
    सुनील शेट्टी

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, सुनील शेट्टी
    रणबीर कपूर

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रणबीर कपूर
    ईशा कोप्पीकर

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ईशा कोप्पीकर