राफेल नदालचं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक यश, 21वं ग्रँड स्लॅम विजेतेपद

राफेल नदाल

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 1 मिनिटे

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने 21 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे.

नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात दोन सेटने पिछाडीवर असतानाही रशियाच्या डॅनियल मेदवेदेवला पराभूत केलं.

यादरम्यान राफेल नदाल पूर्ण भरात खेळ करताना दिसला.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या नदालने 2-, 6-7(5-7), 6-4, 6-4 आणि 7-5 अशा सेटच्या फरकाने विजय प्राप्त केला.

युएस ओपन चँपियन असलेला मेदवेदेव सलग दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी उतरला होता.

पण त्याने दोन सेट जिंकल्यानंतरही राफेल नदालने हार मानली नाही. पुढच्या तीन सेटमध्ये मेदवेदेवला कोणतीही संधी न देता नदालने विजयश्री खेचून आणली.

हा सामना तब्बल 5 तास 24 मिनिट चालला.

फेडरर, जोकोविच दोघांना मागे टाकलं

या विजयासह सर्वाधिक पुरुष सिंगल्सचे खिताब पटकावण्याच्या बाबतीत राफेल नदालने रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांना मागे टाकलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

फेडरर आणि जोकोविच यांच्या नावे आतापर्यंत प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम आहेत. तर नदालने ही विक्रमी 21 वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.

राफेल नदालने 2020 मध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचला हरवून आपलं 20वं ग्रँड स्लॅम पटकावलं होतं.

पायाच्या दुखापतीमुळे पुन्हा मैदानावर परतू किंवा नाही, याबाबत नदालने शंका व्यक्त केली होती.

दरम्यान, कोरोना व्हायरसची लागणही त्याला झाली.

पण त्याच्या काही दिवसांनंतर पुन्हा टेनिस कोर्टवर परतून नदालने या विक्रमाला गवसणी घातली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)