इमॅन्युअल कारपेंटियर आणि जेनिफर डूडना यांना रसायनशास्त्राचं नोबेल

फोटो स्रोत, @NobelPrize
जिनोम एडिटिंग संदर्भातील शोधासाठी इमॅन्युअल कारपेंटियर आणि जेनिफर डूडना या दोन महिला वैज्ञानिकांना रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्टॉकहोममध्ये स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स समितीने बुधवारी पुरस्कारविजेत्यांची घोषणा केली.
गेल्या वर्षी लिथिअम-आयन बॅटरी विकसित करणारे शास्त्रज्ञ जॉन बी गुडइनफ, एम.स्टॅनली विटिंघम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
पुरस्कार विजेत्यांना एक सुवर्णपदक, एक कोटी स्वीडिश क्रोना बक्षीस रकमेने गौरवण्यात येणार आहे.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल रॉबर पॅनरोस, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेआ गेझ यांना जाहीर झालं आहे.
अंतराळविश्वातल्या कृष्णविवराच्या महत्त्वपूर्ण संशोधनाकरता भौतिकशास्त्राचं नोबेल या त्रयीला देण्यात येणार असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केलं.
कृष्णविवर हे अंतराळविश्वातील अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण प्रचंड असते आणि तिथून प्रकाशही परावर्तित होऊन परत येत नाही.
11 लाख डॉलर्स बक्षीस रक्कमेने या त्रिकुटाला गौरवण्यात येईल.
ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर शोधून काढलं.
त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
यंदाचं वैद्यकशास्त्राचं नोबेल हार्वे जे.अल्टर, मायकेल ह्यूटन आणि चार्ल्स एम.राईस यांना जाहीर करण्यात आला. आहे. हेपटायटिस- सी या विषाणूच्या शोधासाठी या त्रिकुटाला गौरवण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








