पाकिस्तान : मतदानाच्या दिवशीच बाँबस्फोटात 31 ठार

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना क्वेटा शहरात झालेल्या जोरदार हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

एका मतदान केंद्रानजीक हा स्फोट झाला.

बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी मोहम्मद काझीम यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या बायपासजवळ हा स्फोट झाला. मृत लोकांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

PML-N, PPP आणि PTI पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

माजी क्रिकेटपटू आणि पीटीआईचे चेअरमन इम्रान खान म्हणाले, 'क्वेटामधील हल्ला पाकिस्तानमधील लोकशाही प्रक्रियेला खीळ बसवण्यासाठी आहे. निरपराध माणसांच्या मृत्यूने अतीव दु:ख झालं आहे. पाकिस्तानच्या जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करून कट्टरवाद्यांचे मनसुबे उधळून लावावेत'.

सिंध प्रांतातील लरकाना पीपल्स पार्टीच्या पोलिंग कॅम्पबाहेर झालेल्या स्फोटात तीन कार्यकर्ते जखमी झाले. बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी रियाझ सोहेल यांच्यानुसार शाह मुहम्मद पोलिंग स्टेशनच्या बाहेर पीपीपी पक्षाच्या कॅम्पजवळ हा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

कट्टरवाद्यांच्या या मनसुब्याने मतदारांना घाबरवलं जाऊ शकत नाही असं पीपीपीचं म्हणणं आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या सवाबी शहरात तहरीक-ए-इन्साफ आणि आवामी नॅशनल पार्टीच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत.

मतदानाची संवेदनशीलता आणि तालिबानचा धोका लक्षात घेऊन या निवडणुकांसाठी 3 लाख 70 हजार एवढं प्रचंड फौज तैनात करण्यात आली आहे.

पाकिस्तानात 270 जागांसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुकीत 95 पक्षांचे मिळून 11,676 उमेदवार रिंगणात आहेत.

अधिकृत मतदारांची संख्या 10 कोटी 59 लाख 55 हजार 409 एवढी आहे.

ही बातमी अपडेट होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त