लता मंगेशकर पिस्तुल रोखतात तेव्हा... लतादीदींचे हे दुर्मिळ 11 फोटो नक्की पाहा
1. कुछ तो गडबड है दया...
लता मंगेशकर यांचा वावर फक्त संगीत क्षेत्रातच नाही तर सर्व कला, साहित्य, राजकारण, क्रीडा क्षेत्रात होता. हे फोटो त्याचीच साक्ष देतात.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, कुछ तो गडबड है दया.... लता मंगेशकरांनी थेट शिवाजी साटम यांच्यावरच पिस्तुल रोखल्याचा हा फोटो. दोन्ही कलाकारांनी या क्षणाचा किती मनमुराद आनंद घेतला आहे ना....
2. यांचं एकाच शब्दात वर्णन करता येईल... दिग्गज
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, लता मंगेशकरांनी अनेक गायकांसोबत गाणी म्हटली, पण मोहम्मद रफींसोबतच्या त्यांच्या गाण्यांना विशेष लोकप्रियता लाभली.
3. तुमच्यासारखं उर्दू बोलून दाखवते....
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, हरीश भिमानी यांनी 'लता दीदी अजीब दास्ताँ है ये' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "एके दिवशी अनिल बिस्वास आणि लता मुंबईच्या लोकल ट्रेनने गोरेगावला जात होते. अचानक वांद्रा स्थानकावर त्या ट्रेनमध्ये दिलीप कुमार चढले." "अनिल बिस्वास यांनी नवीन गायिकेची दिलीप कुमार यांच्याशी ओळख करून दिली, तेव्हा ते म्हणाले, 'मराठी लोकांच्या तोंडातून आमटीभाताचा वास येतो. त्यांना ऊर्दूची चव काय कळणार?' "लता मंगेशकरांनी ही गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारली. यानंतर शफी साहेबांनी त्यांच्यासाठी एका मौलवी प्रशिक्षकाची तजवीज केली. त्यांचं नाव महबूबू होतं. लता यांनी त्यांच्याकडून ऊर्दू भाषेतील खाचाखोचा समजून घेतल्या."
4. कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई'
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, लता यांचं 'ये जिंदकी उसी की है जो किसी का हो गया' हे गाणं संपल्यावर बडे गुलाम अली खाँ म्हणाले, 'कमबख्त कभी बेसुरी होती ही नहीं.'
5. ... आणि पंतप्रधान रडले
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, जवाहरलाल नेहरू कधीच सार्वजनिकरित्या रडत नसत आणि दुसऱ्या माणसासमोर रडणं त्यांना आवडायचं नाही, असं सांगितलं जातं. परंतु, 27 जानेवारी 1963रोजी लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं तेव्हा पंडित नेहरूंना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत.
6. सचिन देव बर्मन यांनी देऊ केलेलं पान
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, सचिन देव बर्मन यांनाही लता मंगेशकरांचा आवाज प्रिय होता. त्यांचं गाणं आवडलं की ते लता यांची पाठ थोपटत आणि पान देऊ करत. सचिनदा पानाचे शौकिन होते.
7. माजी पंतप्रधानांबरोबर...
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी आणि लता मंगेशकर
8. भूलोकीच्या गंधर्वांची मांदियाळी
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, लता मंगेशकर आणि बालगंधर्व... बालगंधर्व आणि मंगेशकर कुटुंबाचा दीनानाथ मंगेशकरांच्या काळापासून स्नेह होता.
9. क्रिकेटप्रेम
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, लता मंगेशकर यांना क्रिकेट अतिशय आवडत असे. त्यांनी पहिल्यांदा 1946 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा कसोटी सामना पाहिला. इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा कसोटी सामनाही त्यांनी पाहिला होता.
10. कितना प्यारा वादा है, इन मतवाली आँखों का
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, लता मंगेशकर यांनी आर. डी. बर्मन यांच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी गायली.
11. गुण गाईन आवडी
फोटो स्रोत, TWITTER/@mangeshkarlata
फोटो कॅप्शन, भाई आणि दीदी... पु. ल. देशपांडे यांच्या गणगोतात लता मंगेशकरांचं स्थान अत्यंत वरचं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.