नागपूर जिल्ह्यात अश्लील डान्समुळे खळबळ, तीन महिलांसह 13 जणांना अटक

अश्लील डान्स, नागपूर, कायदा, प्रशासन, बैलशर्यती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नागपूर जिल्ह्यात दिवसा शंकरपट म्हणजेच बैलांच्या शर्यतीचे आयोजन आणि रात्री अश्लील डान्सच्या कार्यक्रमामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन नृत्यांगना आणि दहा आयोजकांना अटक केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील बामनी या गावात हा प्रकार घडला. 'डान्स हंगामा' नावाखाली हा शो चालवला जात होता आणि या शोमध्ये मुली आपल्या अंगावरील कपडे काढून केवळ अंतर्वस्त्रावर नाचत होत्या असे पोलिसांनी सांगितले.

हा कार्यक्रम पाहायला आलेल्यांपैकी काहीजणांनी या नृत्याचे चित्रीकरण केले आणि या क्लिप व्हायरल झाल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तेव्हा हा कार्यक्रम 17 जानेवारी रोजी झाला होता ही बाब लक्षात आली.

या कार्यक्रमाला किमान 500 जण उपस्थित होते असा अंदाज आहे.

ऑकेस्ट्राच्या नावाखाली अश्लील डान्स

Alex Julie Dance Show या ग्रुपच्या तरुणी या कार्यक्रमात कपडे काढून फक्त अंतवस्त्रांवर डान्स करत होत्या अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. 17 जानेवारीला ह्या डान्सचे आयोजन नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील बामनी या गावात झाले.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये 'डान्स हंगामा' या कार्यक्रमाचे पोस्टर्स गेल्या काही दिवसांपूर्वी लावण्यात आले होते.

डान्स बार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर बीबीसी मराठीला या सांगितले, "बैलांच्या शर्यंतीचा शंकरपट ग्राम पंचायत बामनी कडून आयोजित करण्यात आला होता.

"शर्यतीनंतर याच परिसरात रात्री डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयोजकांनी या डान्स शो मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये असे पैसेही घेतले. बैलांच्या शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. शंकरपट संपला आणि पोलीस गेल्यावर या डान्स शो चे आयोजन करण्यात आले," असे मगर यांनी सांगितले.

अश्लील डान्स, नागपूर, कायदा, प्रशासन, बैलशर्यती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस उप अधीक्षक पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वात ही SIT काम करत आहे," असे पोलिसांनी सांगितले.

कार्यक्रमाला परवानगी नव्हतीच

दरम्यान या प्रकरणी बामनी येथील 'डान्स हंगामा' कार्यक्रमाला कुठलाही परवानगी देण्यात आली नव्हती असे उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यशवंत सोळसे यांनी सांगितले.

या डान्स आयोजनासाठी ज्या लोकांनी साउंड सिस्टिम, लाईट्स पुरविले आणि जे लोक या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांचाही शोध नागपूर ग्रामीण पोलीस करताहेत.

"बामनी गावचे पोलीस पाटील यांनी हे आयोजन थांबविण्याचा प्रयत्न केला होता, पण आयोजकांनी त्यांना न सांगताच हे आयोजन केला," असे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर बीबीसी मराठीला सांगितले.

या ग्रुपच्या लोकांनी बामनी गावाच्या व्यतिरिक्त आणखी तीन चार गावात अशा डान्स शो चे आयोजन केले असावे अशी शक्यता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पूजा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)