आर्यन खानला हृतिक रोशनने खुलं पत्र लिहिल्यावर कंगनाची बॉलिवुडवर टीका

फोटो स्रोत, Getty Images
क्रूझ पार्टीमधल्या ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला उद्देश्यून अभिनेता हृतिक रोशनने एक खुलं पत्र इन्स्टाग्रामवर लिहीलंय. तर अभिनेत्री कंगना राणावतने ताबडतोब यावर टीका केलीय.
सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला रविवारी 3 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ताब्यात घेतलं होतं. आर्यन खान आणि इतरांची 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची मागणी NCBने केली आहे.
अभिनेता हृतिक रोशनने आर्यन खानला सोशल मीडियावरून एक खुलं पत्र लिहिलं आहे. 'माय डिअर आर्यन,' असं म्हणत या पत्रात हृतिकने आर्यनला काही सल्ले दिले आहेत.
"आयुष्य विचित्र आहे आणि देव कणखर लोकांनाच कठीण प्रसंगाला सामोरं जायला लावतो," असं हृतिकन म्हटलंय.
"तुला आता काय वाटतं हे मी समजू शकतो, तुला राग येत असेल, गोंधळल्यासारखं किंवा असहाय्य वाटत असेल. पण याच सगळ्या गोष्टी तुझ्यातला हिरो घडवतील. पण याच गोष्टी तुझ्यातल्या चांगल्या गोष्टीही दूर नेऊ शकतात.
"चुका, अपयश, यश हे अनुभवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या मागे सोडून द्यायच्या हे समजायला हवं," हृतिकने म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
या पोस्टमध्ये हृतिक पुढे म्हणतो, "पण या सगळ्यांमुळे तुझी प्रगती होईल याची मला खात्री आहे. तुला मी लहान मुलगा आणि एक तरुण म्हणूनही पाहिलेलं आहे. तुला येणाऱ्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचा स्वीकार कर.
"माझ्यावर विश्वास ठेव पुढे काही काळाने तुला या सगळ्याचा अर्थ लागेल. आजचे हेच क्षण तुझा उद्याचा दिवस घडवतील. आणि तुझं भविष्य उज्ज्वल असेल, पण त्यासाठी आधी तुला अंधारातून मार्ग ओलांडावा लागेल."
हृतिकने ही पोस्ट केल्याच्या काही वेळातच अभिनेत्री कंगना राणावतने त्यावर टीका करणारी पोस्ट केली आहे.

फोटो स्रोत, Instagram / kanganaranaut
आता सगळे 'माफिया पप्पू' आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत असल्याचं कंगनाने म्हटलंय.
"आर्यनच्या चुकांमुळे त्याला बदल घडवण्यासाठी मदत व्हावी, एखादी व्यक्ती अडचणीत असताना तिच्याबद्दल गॉसिप न करणंच चांगलं पण त्यांनी काहीच चूक केलेलं नाही असं त्यांना भासवणं हा गुन्हा आहे," असं कंगनाने म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








