बारावीचा निकाल जाहीर, असे पाहू शकता तुमचे मार्क

विद्यार्थीनी

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) संपूर्ण राज्यातला बारावीचा निकाल 90.66 टक्के एवढा लागला आहे. आज दुपारी (16 जुलैला) या निकालाची घोषणा करण्यात आली.

कोरोना उद्रेकामुळे यंदा प्रेस नोटद्वारे या निकालाची माहिती जाहीर करण्यात आली. यंदा 93.88 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 88.04 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल जास्त टक्क्यांनी लागण्याची परंपरा यंदाही कायम आहे.

मुलींचा निकाल 93.88 टक्के

यंदाच्या बारावीच्या परिक्षेला पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून 14 लाख 13 हजार 687 विद्यार्थी-विद्यार्थीनी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 81 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.

कोरोना
लाईन

राज्यातल्या 9 विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. इथला 95.89 टक्के आहे. तर, औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 88.18 टक्के इतका आहे. विशेष गोष्ट म्हणजे राज्यातल्या अपंग गटातील विद्यार्थ्यांचा निकाल यंदा 93.57 टक्के लागला आहे.

निकाल कुठे पाहता येईल?

मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. यामुळे परिक्षेला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली. बारावीची परीक्षा यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासायला उशीर झाल्याने त्याचा परिणाम थेट निकाल जाहीर करण्यावर झाला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

विज्ञान शाखेचा निकाल यंदा सर्वाधिक असून तो 96.93 टक्के आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर वाणिज्य शाखेचा निकाल आहे. हा निकाल 91.27 टक्के इतका आहे. कला शाखेचा यंदाचा निकाल 82.63 टक्के एवढा आहे.

याशिवाय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल यंदा 86.07 टक्के लागला आहे.

आजच्या ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणडपताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी यंदापासूनच प्रथमच ऑनलाईन अर्ज मंडळाकडून स्वीकारले जाणार आहेत. यासाठी http://verification.mh-hsc.ac.in/ या लिंकवर क्लिककरून हे अर्ज करता येतील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)