भाजलेल्या स्नेहाला ‘निर्भया’ ने दिलं नवं आयुष्य...
भाजलेल्या स्नेहाला ‘निर्भया’ ने दिलं नवं आयुष्य...

याच महिन्यात, दहा वर्षांपूर्वी दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानं संपूर्ण देशाला आणि जगाला हादरवून सोडलं.
याबद्दल अनेक चर्चा झाल्या यावर बोललं गेलं. पण घराच्या चार भिंतीत होणारा हिंसाचार अनेकदा लपून राहतो. हेच स्नेहा जावळे यांच्या बाबतीत घडलंय.
हुंड्यासाठी झालेलं भांडण इतकं वाढलं की नवऱ्यानचं त्यांच्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली गँगरेप - निर्भया - या नाटकानं स्नेहाचं आयुष्य कसं बदललं... याबद्दल स्नेहानं बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्यसोबत आपला अनुभव शेअर केला.






