ट्रम्प हॉटेलबाहेर टेस्ला सायबरट्रकमध्ये स्फोट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?
ट्रम्प हॉटेलबाहेर टेस्ला सायबरट्रकमध्ये स्फोट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?
अमेरिकेच्या लास वेगास इथं असलेल्या ट्रम्प हॉटेलबाहेर एका टेस्ला सायबरट्रकमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना घडण्याच्या काही तास आधीच अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहरात एका माणसानं ट्रक गर्दीत घुसवून अनेकांना चिरडलं होतं. त्यात किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला.