शेतकऱ्यांनी 10 जूनपर्यंत पेरणी करू नये, कृषी विभागानं हे आवाहन का केलं? गावाकडची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, शेतकऱ्यांनी 10 जूनपर्यंत पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन का? गावाकडची गोष्ट
शेतकऱ्यांनी 10 जूनपर्यंत पेरणी करू नये, कृषी विभागानं हे आवाहन का केलं? गावाकडची गोष्ट

मे महिन्यात महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून पेरणीसाठीच्या तयारीची लगबग चालू झालेलं पाहायला मिळत आहे.

बियाणं-खतं यांची खरेदी किंवा विचारपूस शेतकरी करत आहे. पण, मे महिन्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणी नेमकी कधी करायला हवी?

याबाबत कृषी विभागानं काय आवाहन केलंय, शेती क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणताहेत, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-158

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – राहुल रणसुभे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.