सोपी गोष्ट: Paracetamol, Pan D सारख्या 48 औषधांबद्दल काय वाद निर्माण झालाय?
सोपी गोष्ट: Paracetamol, Pan D सारख्या 48 औषधांबद्दल काय वाद निर्माण झालाय?
सीडीएससीओनं त्यांच्या दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या औषधांच्या यादीत 48 निकृष्ट किंवा आवश्यक गुणवत्तेसाठी पात्र ठरत नसलेल्या औषधांची नावं दिली आहेत. यात सर्रास वापरण्यात येणाऱ्या पॅरासिटेमॉल, पॅन-डी आणि ग्लायसिमेट एसआर 500 या औषधांचा समावेश आहे. यासोबतच CDSCO ने चाचणी केलेल्या औषधांपैकी 5 औषधं किंवा ही बॅच आपण तयार केली नसल्याचं सन फार्मा आणि टोरंट फार्मासारख्या आघाडीच्या औषधनिर्मिती कंपन्यांनी म्हटलंय.
नेमकं काय झालंय? आपण घेत असलेली औषधं योग्य आहेत, यासाठी कोणती खबरदारी घ्यायची? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर



