स्पेसएक्स पोलारिस डॉन मिशन काय आहे? अंतराळ पर्यटन सुरू होणार?
खासगी पैशांतून स्पेसवॉकसाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली.
अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे. या मोहीमेचं नावं आहे पोलारिस डॉन.
जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे. फाल्कन 9 च्या या पोलारिस डॉन मोहीमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र असणारे निवृत्त एअर फोर्स पायलट स्कॉट 'किड' पोटीट आणि स्पेस एक्सचे दोन इंजिनियर्स ॲना मेनन आणि सारा गिलीस सहभागी आहेत.
अंतराळात जाणाऱ्या या यानाचं नाव आहे रिझीलियन्स (Resilience). हे अंतराळयान या चार प्रवाशांना पृथ्वीपासून तब्बल 1400 किलोमीटर्स (870 मैल) उंचीवर घेऊन जाईल. यापूर्वी 1970च्या दशकामध्ये नासाच्या अपोलो अंतराळ मोहीमांमधली यानं इतक्या उंचीवर अंतराळवीरांना घेऊन गेली होती.
कशी होणार आहे ही मोहीम? यादरम्यान कोणते प्रयोग करण्यात येणार आहेत?
रिपोर्ट - पल्लब घोष
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे






