पुणे जिल्ह्यात शासकीय वसतीगृहाच्या विद्यार्थिनींना प्रेग्नन्सी टेस्ट का करावी लागतेय?

व्हीडिओ कॅप्शन, पुणे जिल्ह्यात शासकीय वसतीगृहाच्या विद्यार्थिनींना प्रेग्नन्सी टेस्ट का करावी लागतेय?
पुणे जिल्ह्यात शासकीय वसतीगृहाच्या विद्यार्थिनींना प्रेग्नन्सी टेस्ट का करावी लागतेय?

पुणे जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सुट्टीनंतर वसतीगृहात परतल्यानंतर वैद्यकीय चाचणी करावी लागते, असं काही विद्यार्थिनींनी बीबीसी मराठीला सांगितलं. तसंच यासाठी प्रेग्नन्सी चेक करणारं किट मेडिकलमधून आणावं लागत असल्याचंही मुली सांगतात.

दरम्यान, आदिवासी विकास आयुक्तालयाने 30 सप्टेंबर 2025 ला परिपत्रक काढून 'विद्यार्थिनींना फिटनेस सर्टिफिकेटच्या वेळी यूपीटी म्हणजेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात येऊ नये' असे निर्देश दिले होते.

विद्यार्थिनींना कराव्या लागणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्टविषयी आदिवासी विभाग आणि आरोग्य विभाग यांची बाजूही जाणून घेतली आहे.

रिपोर्ट- दीपाली जगताप

शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- शरद बढे

प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)