आधार कार्डसाठी सांगलीच्या जुळ्या भावांची 8 वर्षांपासून फरपट
आधार कार्डसाठी सांगलीच्या जुळ्या भावांची 8 वर्षांपासून फरपट
सांगलीच्या वाळवा इथे राहणाऱ्या निलेश आणि योगेश घळगे या दोन जुळ्या भावांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येतायत. तब्बल आठ वर्षं ते आपल्या आई-वडिलांसह वणवण करत आहेत.
दोन्ही जुळ्या भावांचं वयाच्या पाचव्या वर्षी आधारकार्ड निघालं पण नंतर अपडेट करताना व्हेरिफिकेशनची अडचण येतेय. सुरुवातीला या दोन्ही भावांचे बायोमेट्रिक्स सारखे असल्याची चर्चा होती, पण बीबीसी मराठीने नेत्रतज्ञांशी बोलून त्याचीही पडताळणी करुन पाहिली.
घळगे कुटुंबाला आधार कार्ड नसल्याने आता प्रत्येक ठिकाणी संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे.
- रिपोर्ट- सरफराज सनदी
- शूट- नितीन नगरकर
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
- निर्मिती- प्राजक्ता धुळप



