हिंजवडी आयटी पार्क परिसरात ट्रॅफिक जामचा प्रश्न कसा सुटणार?
हिंजवडी आयटी पार्क परिसरात ट्रॅफिक जामचा प्रश्न कसा सुटणार?
आज हिंजवडीतील नोकरदार वर्गाला तीन-चार तास प्रवासात घालवावे लागतात, त्यात पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.
हिंजवडी परिसरात राजीव गांधी इन्फोटेक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात 1990 मध्ये आला. 700 हेक्टरवर पसरलेल्या या आयटी पार्क मध्ये 150 हून अधिक नामांकित कंपन्या आहेत. यात आयटी सोबतच फार्मास्युटिकल, मॅन्युफॅक्चरींग, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र कंपन्यांची संख्या वाढत गेली तशी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढली आणि हिंजवडी आणि ट्रॅफिक जॅम हे समीकरण बनत गेलं.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






