व्हिएतनाम : वादळामुळे पूल कोसळला, घरांमध्ये पाणी शिरलं, आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, शक्तिशाली वादळामुळे पूल कोसळला, घरांमध्ये पाणी शिरलं, आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू
व्हिएतनाम : वादळामुळे पूल कोसळला, घरांमध्ये पाणी शिरलं, आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू

व्हिएतनाममधल्या एका पुलाचा भाग शक्तिशाली वादळानंतर कोसळला.

प्रशांत महासागरातल्या यागी वादळाने व्हिएतनामसह चीन आणि फिलिपीन्समध्येही हाहाःकार माजवलाय. फू थो प्रांतात फाँग चाऊ पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर लाल नदीत अनेक वाहनं वाहून गेली.

काही काळ वारे ताशी 250 किमी वेगाने वाहत होते. वादळाचा जोर कमी झाल्यानंतर अनेक भागांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली. 7 सप्टेंबरला व्हिएतनामला धडकल्यापासून या वादळामुळे किमान 59 जणांचा जीव गेला आहे.

मासेमारी करण्यासाठी गेलेली जहाजं बेपत्ता झाल्यामुळं मच्छिमारांचा शोध घेणं सुरू आहे. अनेक भागात शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.

पाहा हा व्हीडिओ.