'एक आदर्श शिक्षिका आणि ट्रान्सजेंडर म्हणून मला समाजात प्रतिष्ठा हवीय'

व्हीडिओ कॅप्शन, टान्सजेंडर शिक्षिका: रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील रिया आळवेकर यांची प्रेरणादायी गोष्ट
'एक आदर्श शिक्षिका आणि ट्रान्सजेंडर म्हणून मला समाजात प्रतिष्ठा हवीय'

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचं आणि शिक्षिका रिया आळवेकर यांचं खूप कौतुक होतंय. ते रिया यांनी वेगळं धाडस दाखवलं यासाठी.

वयाच्या 28 वर्षापर्यंत त्या प्रवीण आळवेकर म्हणून पुरुषाच्या वेशात वावरत होत्या. पण त्यानंतर त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन आपली खरी ओळख जगासमोर आणली.

त्यांची शाळा त्यांना उत्तम शिक्षिका म्हणून नावाजते. इतकंच नाही तर त्यांच्या कामाबद्दल शिक्षक आणि पालकांना अभिमान वाटतो.

रिपोर्ट - मयांक भागवत

शूट - शाहिद शेख

व्हीडिओ एडिट - निलेश भोसले

निर्मिती - प्राजक्ता धुळप