कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले शिंदे?

व्हीडिओ कॅप्शन, कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया...
कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले शिंदे?

बीबीसी मराठीच्या राष्ट्र-महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत झाली.

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या व्हीडिओमध्ये त्याने केलेल्या कवितेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.

या तोडफोड प्रकरणानंतर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अखेर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील मौन सोडलं आहे.