आफ्रिकेतून भारतात आलेल्या सिद्दी समुदायातील शाहीन जेव्हा देशासाठी मेडल्स जिंकते

व्हीडिओ कॅप्शन, आफ्रिकेतून भारतात गुलाम बनून आलेल्या सिद्दी समुदायातील शाहीन जेव्हा देशासाठी मेडल्स जिंकते
आफ्रिकेतून भारतात आलेल्या सिद्दी समुदायातील शाहीन जेव्हा देशासाठी मेडल्स जिंकते

सिद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकन वंशाचे साधारण 20,000 लोक भारतात आहेत, ज्यांपैकी बहुतेकांना अनेक वर्षांपूर्वी गुलाम म्हणून भारतात आणण्यात आलं होतं. याच सिद्दींपैकी एक शाहीन दरजादा, ती ज्युडो चॅम्पियन आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तिनं स्वत:च्या समुदायासाठी आणि देशासाठी एक इतिहास रचला. 57 किलो वजनी गटात खेळत, ती इंडोनेशियातील आशियाई ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आणि पेरूमधील जागतिक ज्युनियर्ससाठी पात्र ठरली.

रिपोर्ट : दिव्या आर्य

कॅमेरा-एडिट : संदीप यादव

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)