चंद्रपूर इथली विकासाची गोष्ट: सुषमा मोहुर्लेंनी बदललं गावांचं रूप, कसं थांबवलं स्थलांतर?
2011 मध्ये पतीच्या निधनानंतर चंद्रपूरच्या आदिवासी भागातल्या सुषमा मोहुर्ले यांनी गावातच रोजगार निर्माण करण्याचा निर्धार केला. गेली पंधरा वर्षं त्या अक्षय सेवा संस्थेच्या माध्यमातून तेंदूपत्ता आणि इतर वन-उपजावर आधारित स्थानिक रोजगार उभा करत आहेत.
सरपंच म्हणून त्यांनी ग्रामसभा बळकट केली आणि मनरेगा (MGNREGA) व वनहक्क कायदा (Forest Rights Act) यांची सांगड घालून अनेक आदिवासी कुटुंबांचं स्थलांतर थांबवलं.
300 आदिवासी महिलांसोबत सुरू केलेल्या वनधन विकास केंद्रामुळे मजुरी करणाऱ्या महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज ब्रम्हपुरी आणि नागझिरी तालुक्यात सुषमा मोहुर्ले शेकडो महिलांसाठी आधारवड ठरल्या आहेत.
ही आहे गावातच संधी निर्माण करून स्थलांतर (migration) थांबवणाऱ्या महिलेची प्रेरणादायी गोष्ट.
रिपोर्टिंग सहाय्य- अविनाश पोईनकर
शूट- हेमंत एकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






