तरूण 2 तास डबक्यातून मदतीसाठी ओरडत राहिला, तरीही मृत्यू; असं का घडलं? - ग्राऊंड रिपोर्ट
तरूण 2 तास डबक्यातून मदतीसाठी ओरडत राहिला, तरीही मृत्यू; असं का घडलं? - ग्राऊंड रिपोर्ट
17 जानेवारी 2026 ला रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 150 मध्ये एका 27 वर्षीय अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला.
नोएडाच्या सेक्टर 150 मध्ये अनेक वर्षांपासून एक मोठा खड्डा आहे, जो अपूर्ण बांधकामामुळे पाण्याने भरलेला आहे.
दाट धुक्यामुळे अंधारात गाडी चालवणाऱ्या या तरुणाला त्या रात्री रस्ता दिसत नव्हता आणि तो थेट जाऊन त्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पडला. तो जवळजवळ 2 तास त्या डबक्यातून मदतीसाठी ओरडत राहिला, पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. असं का घडलं?
एका तरुण होतकरू मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण - अंधार, धुकं की अक्षम प्रशासन?
नोएडाच्या सेक्टर 150 मधून बीबीसी मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहा.
रिपोर्ट - गुलशनकुमार वनकर आणि दिलनवाज पाशा
शूट, एडिट - निलेश भोसले आणि दीपक जसरोटिया
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






