उषा वेन्स: अमेरिकन निवडणुकीत चर्चेतील भारतीय वंशाची महिला
उषा वेन्स: अमेरिकन निवडणुकीत चर्चेतील भारतीय वंशाची महिला
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले उप-राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जेडी वेन्स यांची निवड केलीय.
जे डी वेन्स एकेकाळी ट्रंप यांचे कट्टर विरोधक होते, आता ते ट्रम्प यांचे रनिंग मेट तर आहेतच, शिवाय ते ओहायोचे सिनेटर म्हणजे खासदार आहेत.
तसंच एक लेखक, गुंतवणूकदार आणि समीक्षकसुद्धा आहेत. आणि त्यांचं भारताशी फार जवळचं कनेक्शन आहे. त्यांच्या पत्नी उषा वेन्स या भारतीय वंशाच्या आहेत.





