लिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय? ते टाळण्यासाठी काय करावं?

लिंग फ्रॅक्चर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

Penile Fracture ही सुद्धा पुरुषांमध्ये आढळणारी पण फारसं न बोललं जाणारी समस्या आहे. साध्या मराठीत सांगायचं झालं तर लिंग फ्रॅक्चर होणं.

सेक्स करताना लिंग योनीत जाण्याऐवजी स्त्रीच्या पायावर किंवा गुप्तांगावर आदळलं तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना केली नाही तर दीर्घकाळ शारीरिक आणि लैंगिक क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सेक्स करताना स्त्री पुरुषाच्या शरीरावर असेल किंवा अनैसर्गिक सेक्स करत असाल तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते.

हस्तमैथुन करताना किंवा ताठरलेल्या लिंगावर एखादी वस्तू पडली तर लिंग फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता आहे.

लिंग फ्रॅक्चर होणं ही पुरुषांच्या जननेंद्रियाला होणारा मोठा आघात आहे. सेक्स करताना लिंग फ्रॅक्चर होण्याच्या घटना सर्वांत जास्त प्रमाणात होतात.

लिंग कुठे आदळलं तर ताठरलेल्या लिंगावर दाब येतो आणि त्यामुळे Tunica Albugenia हा भाग फाटतो. लिंग फ्रॅक्चर झाल्यावर जर तातडीने उपचार घेतले नाहीत तर मोठी शारीरिक समस्या उद्भवू शकते आणि त्याचा लैंगिक आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होतो.

लिंग फ्रॅक्चर होण्याची समस्या सेक्स करतानाच होते. एका संशोधनात 57.2% पुरुषांनी सेक्स करतानाच लिंग फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. विशेषत: सेक्स करताना स्त्री पुरुषाच्या शरीरावर असेल किंवा अनैसर्गिंक संभोग करताना लिंग फ्रॅक्चर होतं.

हस्तमैथुन करतानासुद्धा इजा होऊ शकते किंवा ताठरलेल्या लिंगावर एखादी वस्तू पडली तरीसुद्धा लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही इजा अर्थातच पुरुषांना होते. मध्यमवयीन पुरुषांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. विशेषत: 30 ते 50 या वयोगटात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. विषमलिंगी पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. समलिंगी पुरुषांमध्येही समस्या आढळते. हे प्रमाण 1.8 % आहे.

त्यामुळे लैंगिक आकर्षण कोणाकडे आहे हा इथे मुद्दा नाही. एक संशोधनानुसर तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा वीकेंडला या घटना होण्याचं प्रमाण वाढतं.

लिंग फ्रॅक्चर झाल्यावर जननेंद्रियात प्रचंड वेदना होतात, तिथे जखमाही होण्याची शक्यता असते. लिंगाचा आकार मोडल्यासारखा असतो.

सेक्सॉलॉजिस्ट डॉ.प्रसन्न गद्रे याविषयी अधिक माहिती देताना सांगतात, “लिंगाला हाड नसतं, मग ते फ्रॅक्चर होऊ शकतं का? तर नक्कीच शक्य आहे. लिंगावर कोणत्याही प्रकार आघात झाला किंवा अपघात झाला तर त्याला ढिलं पडलेल्या पेनिसचं फ्रॅक्चर असं म्हणतात.

"ताठर झालेलं फ्रॅक्चर होण्याची कारणं असतात. झोपल्यावर स्वप्नावस्थेत असताना लिंग ताठरलं आणि अचानक कुशीवर वळलं तरी लिंगाला फ्रॅक्चर होऊ शकतं. हस्तमैथुन करताना ते कुठे घुसवण्याची क्रिया केली तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.”

“सेक्स करताना अनेकदा योनीमार्ग आकुंचन पावतो, त्यावेळी लिंग बळजबरीने आत घालण्याचा प्रयत्न केल्यास हे फ्रॅक्चर होऊ शकतं. अनल सेक्स करतानाही अशाप्रकारे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते,” गद्रे पुढे म्हणतात.

निदान कसं होतं?

लिंग फ्रॅक्चरचं निदान करण्यासाठी नेहमीच्या पद्धती वापरतात. त्यात अल्ट्रासाऊंडने या रोगाचं निदान करता येतं. पण ते करताना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते.

त्यामुळे ही पद्धत योग्य आहे की नाही याबाबत नेहमी वाद होतात. फ्रॅक्चर झाल्यानंतर सर्जरी हा अतिशय चांगला उपाय आहे. CT स्कॅनच्या माध्यमातून सर्जरीची योग्य जागा ओळखता येते.

लिंग फ्रॅक्चर झाल्यावर तातडीने काय उपाययोजना केली पाहिजे याविषयी बोलताना डॉ.गद्रे सांगतात, “दुर्दैवाने असं काही झाल्यास तातडीने हॉस्पिटल गाठावं. कारण ही सुद्धा जखम आहे. प्रथमोपचार म्हणून अजिबात जास्त हालचाल करू नये. फ्रॅक्चर झाल्याचं लक्षात येताच मूत्रशल्यविशारदाकडे जाण्याआधी त्या जागेवर बर्फ ठेवावा. पॅडिंग करणं हाही प्रथमोपचाराचा महत्त्वाचा टप्पा आहे. घरात सॅनिटरी पॅड असल्यास तो लावावा, किंवा लंगोटीचा आधार द्यावा.

"डोकं खाली आणि पाय वर करायचे. या उपचार पद्धतीला RICE (Relaxation, Icing, Cushion Elevation) असं म्हणतात. तातडीने सर्जरी करणं हा यावरचा महत्त्वाचा उपाय आहे."

लिंग फ्रॅक्चर

फोटो स्रोत, Getty Images

सर्जरी आणि त्यानंतर

लिंग फ्रॅक्चर झाल्यामुळे लैंगिक जीवनावर परिणाम होतो. ज्यांना ही इजा होऊन गेली आहे त्यांना बराच काळ हा परिणाम जाणवतो. काहींना ऑपरेशन झाल्यानंतर काही काळ हा परिणाम जाणवतो. मात्र बहुतांश रुग्णांमध्ये हा परिणाम दीर्घकाळ पहायला मिळतो.

लिंग फ्रॅक्चर झाल्यानंतर सेक्स करताना अनेकांना नैराश्य येतं, दडपण येतं. ही इजा होण्याच्या भीतीने सेक्स करण्याच्या पद्धतीतही मोठा फरक आढळतो. त्यामुळे सर्जरी झाल्यानंतर अनेकांना समुपदेशन करावं लागतं.

छोट्या छोट्या गाठी येणं, लिंगाचा आकार बदलणं, लिंग न ताठरणं, वेदना, सूज, मूत्रविसर्जनात समस्या असे अनेक आजार उद्भवू शकतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE

सर्जरी झाल्यानंतर लिंगाचा आकार बदलण्याचीही शक्यता असते. लिंग ताठरला की वेदना होतात, तसंच लिंग ताठरल्यावर त्याची लांबी आधीपेक्षा कमी होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळे सर्जरी करण्याधी डॉक्टरांनी रुग्णांबरोबर या सर्व गुंतागुंतीची चर्चा करावी.

सर्जरीनंतर काय काळजी घ्यायची याची रुग्णांना योग्य माहिती मिळायला हवी. सर्जरीनंतर कॅथेटर सगळ्यात महत्त्वाचा आहे हे रुग्णांना सांगायला हवं. सर्जरीनंतर किमान चार आठवडे कॅथेटर ठेवावा अशी सूचना देणं अत्यावश्यक आहे. सर्जरीनंतर झालेली जखम स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. जखमेच्या आसपासचे केस काढण्याचा प्रयत्न करू नये.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)