कॅफीनचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो?
कॅफीनचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो?
कॅफीन बद्दल तुम्ही ऐकलंच असेल? याच एका पदार्थामुळे आपल्याला दररोज आपली कॉफी हवी असते, किंवा मुलं-मुली सतत कुठलं ना कुठलं सॉफ्टड्रिंक घेण्याचे अडिक्ट झाले असतात.
कॅफिन हे जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं सायकोएक्टिव्ह ड्रग आहे.
तज्ञ सांगतात की 19 वर्षांपर्यंतच्या मुला/मुलींनी एका दिवसात 100 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेऊ नये.
म्हणजे किती?
- 1 लहान कप कॉफी
- किंवा 1 कॅन एनर्जी ड्रिंक
- किंवा 2 लहान सोडा
पण अनेक एनर्जी ड्रिंक्सच्या एका कॅनमध्ये 150 ते 300 मिलीग्राम कॅफिन असतं. म्हणजे सुरक्षित मर्यादेच्या 3 पट जास्त.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






