राहुल गांधींनी 'मतचोरी'चा आरोप केलेल्या राजुरा मतदारसंघातले उमेदवार काय म्हणाले?
राहुल गांधींनी 'मतचोरी'चा आरोप केलेल्या राजुरा मतदारसंघातले उमेदवार काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत आणखी एक पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवरचा आपला हल्ला सुरूच ठेवला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांची नावं गाळण्यात आली, आणि ती गाळण्याची शिफारस ज्यांनी केली, त्यांच्यासुद्धा माहितीशिवाय हे करण्यात आलं, असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.
याची उदाहरणं देताना राहुल गांधींनी कर्नाटकमधल्या आळंदसोबत महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघाचं उदाहरण दिलं.
पाहा राहुल गांधी काय म्हणाले, निवडणूक आयोगाने त्यांना काय उत्तर दिलं. आणि इथून लढलेले तीन उमेदवार यावर काय म्हणतात.
- रिपोर्ट - भाग्यश्री राऊत आणि गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर





