मराठी मुलीची दिल्लीत हत्या, प्रियकराने तुकडे करून फेकलं जंगलात
आधी प्रेम मग पळून जाऊन लिव्ह – इन रिलेशनमध्ये दिल्लीत वास्तव्य. त्यानंतर परस्परांमध्ये खटके उडू लागले आणि मुलाने मुलीची हत्या केली.
त्यानंतर त्याचे 35 तुकडे करून फ्रीझमध्ये ठेवले. फ्रीजमधून तुकडे काढून ते रोज दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतोय.
हा प्रसंग नुकताच दिल्लीत उघड झाला असून यातले तरूण – तरूणी हे वसईचे आहेत. यातल्या मृत तरुणीचं नाव आहे श्रद्धा वालकर तर तरुणाचं आफताब अमीन पूनावाला. दिल्ली पोलिसांनी आफताबला तिथल्या मेहरोली भागातून अटक केलीय.
हेही पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



