कंपनीत झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू, 14 जखमी; तरीही सरकारी अधिकारी गप्प का?
कंपनीत झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू, 14 जखमी; तरीही सरकारी अधिकारी गप्प का?
नागपुरातील बाजारगावजवळील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. स्फोटोत जखमी झालेला अमोल लोखंडे मूळचा कोंढाळीचा. स्फोट झाला त्याचवेळी तो प्लांटमध्ये काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये अमोलसह 14 कामगार जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला.
स्फोट का झाला याचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही. पण, आम्ही चौकशी करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
रिपोर्ट - भाग्यश्री राऊत
शूट - मनोज आगलावे
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






