लाडक्या बहिणींच्या 1500 चे 2100 कधी होणार? आदिती तटकरे म्हणतात...

व्हीडिओ कॅप्शन, लाडक्या बहिणींच्या 1500चे 2100 कधी होणार?
लाडक्या बहिणींच्या 1500 चे 2100 कधी होणार? आदिती तटकरे म्हणतात...

निवडणूक होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये होणार अशी घोषणा महायुतीने केली होती. प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये होईल अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. पण 100 दिवस उलटूनही नेमकी ही रक्कम कधी वाढणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील उत्तरं बीबीसी मराठीच्या मंचावर दिली.

महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राष्ट्र-महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी येऊन आपली भूमिका मांडली.