झेलेन्स्की आणि ट्रम्प कॅमेऱ्यासमोरच भांडले तेव्हा, पाहा नेमके काय घडले?
झेलेन्स्की आणि ट्रम्प कॅमेऱ्यासमोरच भांडले तेव्हा, पाहा नेमके काय घडले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्यात वादळी बैठक झाली. वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या चर्चेचं रुपांतर वादात झालं.
तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही, युक्रेन रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं.
त्याचप्रमाणे अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी झेलेन्स्की यांना अनादर करणारे नेते म्हटलं आहे.
सुरुवातीला शांतपणे चर्चा झाल्यानंतर 10 मिनिटे या नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.
पाहा, त्यांच्यातील या खडाजंगीचा व्हीडिओ.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






