सोपी गोष्ट : हैतीमध्ये राजकीय अस्थैर्य कधीपासून आहे?
सोपी गोष्ट : हैतीमध्ये राजकीय अस्थैर्य कधीपासून आहे?
हैती हा जगातला असा पहिला देश होता जो कृष्णवर्णीय नेतृत्वाखाली प्रजासत्ताक झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला या कॅरिबियन देशाने फ्रेंच वसाहत म्हणून असणारं नियंत्रण आणि गुलामगिरी उलथून टाकली.
पण हे स्वातंत्र्य त्यांना महागात पडलं. वेगळं होण्यासाठी त्यांना फ्रान्सला पैसे द्यावे लागले. पण गरिबी, वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती, देशावर असणारं कर्ज आणि राजकीय अस्थिरता यामुळे हैती पोळून निघालाय.
2024 चं वर्ष तर हैतीसाठी कमालीच्या राजकीय उलथापालथीचं ठरतंय. नेमकं काय घडतंय इकडे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - विशाखा निकम
एडिट - निलेश भोसले






