भारतानं पाकिस्तानात जिथं हल्ला केला, तिथली पहिली दृश्यं पाहा

व्हीडिओ कॅप्शन, ऑपरेशन सिंदूर : भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर मुझफ्फराबादमधली पहिली दृश्य
भारतानं पाकिस्तानात जिथं हल्ला केला, तिथली पहिली दृश्यं पाहा

भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानातील 9 ठिकाणांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केलं आहे. भारत सरकारनं एका निवेदनाद्वारे या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली.

भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली."

भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शाहबाज शरीफ म्हणाले की, "भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे."

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता.