नेपाळमध्ये फेसबुकसह 'या' 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी का घालण्यात आली?

व्हीडिओ कॅप्शन, सोशल मीडियावर बंदी, तरुणांकडून सरकार विरोधात निदर्शनं
नेपाळमध्ये फेसबुकसह 'या' 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी का घालण्यात आली?

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनात तरुण आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 17 जणांचा मृत्यू झाला, तर देशभरात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळ सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. मात्र, कंपन्यांनी त्यात रस दाखवला नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात नेपाळ सरकारनं 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली.

बंदी घातलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅपसह मॅसेजिंग प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.