HMPV विषाणूमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार? नवीन लस येणार? डॉ. रमण गंगाखेडकर काय सांगतात?

व्हीडिओ कॅप्शन, HMPV विषाणूमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार? नवीन लस येणार? डॉ. रमण गंगाखेडकर सांगतात...
HMPV विषाणूमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार? नवीन लस येणार? डॉ. रमण गंगाखेडकर काय सांगतात?

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय.

चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले.

पण हा विषाणू खरंच किती धोकादायक आहे? त्यावरची लस येईल का? आणि त्यामुळे भविष्यात लॉकडाऊनसारखी वेळ ओढवेल का?

पाहा ज्येष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांच्याशी साधलेला हा संवाद.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)