गोव्यात नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये कोणाचा समावेश?

व्हीडिओ कॅप्शन, गोव्यात नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू
गोव्यात नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये कोणाचा समावेश?

गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये शनिवार-रविवारच्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी सव्वानऊच्या सुमारास केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. त्यापूर्वी पहाटे घटनास्थळी भेटीनंतर सावंत यांनीच 23 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. त्यात नंतर वाढ झाली.

सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतांपैकी बहुतेक जण या क्लबचेच कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)