राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये का जात नाहीय?
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये का जात नाहीय?
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीने सध्या जोर पकडलाय.
गेल्या निवडणुकांवेळी काँग्रेस गुजरातमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. मात्र, काँग्रेस पक्ष सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.
मात्र ही यात्रा गुजरातमधून जाणार नाहीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांच्याशी गुजरातमध्ये बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी संवाद साधला.






