पूर आलेला असतानाही बस जेव्हा पाण्यात गेल्या
पूर आलेला असतानाही बस जेव्हा पाण्यात गेल्या
उत्तर भारतात 8 आणि 9 जुलैपासून अतिवृष्टी होतेय. साहरणपूरमध्ये हिंडन नदीच्या पुरात एक बस अडकली.
पूर आलेला असतानाही ड्रायव्हरने बस पाण्यात घातल्याचं दिसून आलं.
मात्र, बस पुरात अडकली आणि नंतर एका बाजूला कलंडली. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत बसमधल्या प्रवाशांना वाचवलं. तसंच, उत्तराखंडमध्येही डेहरादूनजवळ एक बस पुराच्या पाण्यात फसली. यावेळी स्थानिकांनी प्रशासनाची वाट न पाहता बसमधल्या प्रवाशांना वाचवलं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



