एलपीजी गॅसच्या किंमती वाढत असताना घरच्या घरी बनवला जाणारा गॅस
अमेरिकेतील अशोका चेंजमेकर या संस्थेचा ग्रीन स्क्रील इनोव्हेशन चॅलेंज पुरस्कार जिंकणारे पुण्याचे इंजिनिअर प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे. त्यांनी घरातल्या कचऱ्यापासून स्वयंपाकाच्या गॅस तयार करण्याचं तंत्र विकसित केलंय.
आज पुण्यातल्या 300 घरांमध्ये हा बायोगॅस वापरला जातोय. एलपीजी गॅसच्या किंमती वाढत असताना असा घरच्या घरी बनवला जाणारा गॅस लोकांना परवडू शकतो का? सध्यातरी या तंत्राची किंमत लाखाच्या घरात आहे. हे तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा फायदा आणि तोटा काय आहे हे सांगणारा रिपोर्ट.
रिपोर्ट- मानसी देशपांडे
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)