शेतकरी प्रश्न मांडणारा युट्यूबर

व्हीडिओ कॅप्शन, रॉयल शेतकरी : शेतकऱ्यांचे प्रश्न युट्यूबवर मांडणारा युट्यूबर

गेवराई तालूक्यातील सुशी वडगावचा गणेश फरताडे हा शेतकऱ्यांचे विषय मांडणारा टिकटॉकर म्हणून प्रसिद्ध होता. पण भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर तो आता युट्यूबकडे वळलाय.

गणेश युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो तसेच त्यांना मार्गदर्शनही करतो. आता युट्यूबवर गणेशचे एक लाख वीस हजार सबस्क्रायबर आहेत.

शेतकरी व्हीडिओखाली त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मांडतात. त्या प्रश्नांची उत्तरं व्हीडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो, असं गणेश सांगतो.

रिपोर्ट - राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)